- पिंपरीतील एचए कंपनी तातडीने सुरु करून रेमडेसीवीरला पर्याय द्या..
- सचिन गोडांबे यांची देशाच्या पंतप्रधानांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२१) :- सध्या राज्य व केंद्र सरकार खासगी कंपन्यांकडून कोट्यवधी रू. खर्चून रेमदेसीवीर सारखी इंजेक्शन महागड्या दराने खरेदी करत आहे. पिंपरी, पुणे येथील सरकारी हिंदुस्थान अँटीबायोटिक्स ही देशातील अँटीबायोटिक्स बनविणारी सर्वांत मोठी कंपनी आहे. परंतु भ्रष्ट बड्या फार्मा कंपन्यांच्या दबावाखाली वरिष्ठ नोकरशहा व राजकारणी यांच्या युतीने या कंपनीला कायम बंद ठेवण्यासाठी व तिच्या शेकडो एकर जागेसाठी जनतेला फसविले आहे.
प्रत्येक मेडिसिन किंवा इंजेक्शनचा केमिकल सॉल्ट काम्पोझिशन असतो. ज्याला जनरिक मेडिसिन असेही म्हणतात. बलाढ्य औषध कंपन्या सुमारे ४०-५० % किमान नफा आपल्या गोळया, इंजेक्शन याद्वारे कमवीत असतात व बड्या डॉक्टरना त्या प्रिस्क्रिप्शन मध्ये लिहिण्यासाठी महागडी गिफ्ट देत असतात हे उघड गुपित आहे.
रेमडेसीवीर हे जीवन संरक्षक औषध (Life Saving Drug) अजिबात नाही, हे तज्ञानी स्पष्ट केले आहे. त्यामुळे छातीतील इन्फेकशन कमी करण्यासाठी तसे इंजेक्शन HA कंपनीमार्फत सरकारने तयार करून घ्यावे. रेमडेसीवीर सारख्या इंजेक्शनचा केमिकल सॉल्ट काम्पोझिशन असणारं इंजेक्शन अत्यल्प दरात निर्माण करावे व या खासगी बलाढ्य कंपन्यांची मक्तेदारी मोडून काढावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन गोडांबे यांनी देशाच्या पंतप्रधानांकडे केली आहे.


















