न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२१) :- तळेगाव एमआयडीसीमधील जनरल मोटर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने कोरोना उद्रेकाचे कारण देत १४१९ कामगारांना काढून टाकले आहे. मात्र कंपनीचा हा निर्णय अन्यायकारक असल्याचा दावा कामगार युनियनने केला आहे.
तळेगाव औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्रमांक A-१६ मध्ये जनरल मोर्टर्स इंडिया प्रायव्हेट कंपनी आहे. मात्र या कंपनीने कोरोना संकटाचे कारण देत आपल्या A यादीतील जवळपास १४१९ कामगारांना कमी केले आहे.

















