- दोघांची हिंजवडी पोलिसांकडून उचलबांगडी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरातून इतर राज्यात जाणाऱ्या प्रवाशांना करोनाचा बनावट निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून २८ करोनाचे निगेटिव्ह रिपोर्ट जप्त करण्यात आले आहेत.
याप्रकरणी दोन जण फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी पत्ताराम केसारामजी देवासी आणि राकेशकुमार बस्तीराम वैष्णव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. त्यांचे इतर दोन साथीदार अद्याप फरार असून त्यांचा शोध हिंजवडी पोलीस घेत आहेत.
निगेटिव्ह रिपोर्ट हवा असल्यास ५००-६०० रुपये मोजावे लागत असल्याचे तपासातून पुढे आलं. दरम्यान, दोन्ही आरोपी हे ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशी बसवून देण्याचं काम करत. त्यांच्याकडे आढळलेले रिपोर्ट हे बावधन येथील लाईफनीटी वेलनेस इंटरनॅशनल लिमिटेड येथील असून, त्यांच्या निगेटिव्ह रिपोर्टवरूनच आरोपी इतर डॉक्टरांच्या बनावट सह्या करून रिपोर्ट बनवत असत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे

















