- रुग्णांच्या नातेवाईकांशीही साधला प्रत्यक्ष संवाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२१) :- सद्यस्थितीमध्ये जम्बो कोविड रुग्णालयाच्या बाबतीत बऱ्याचश्या तक्रारी बातम्या येत असल्याने पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी मनपाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, अतिरिक्त वैद्यकिय अधिकारी पवन साळवे, वाय.सी.एम.चे डॉ. पाठक, जम्बो कोविड रुग्णालयाचे समन्वयक खांडेकर, जोशी, सुनिल वाघमारे तसेच जम्बो कोविडचे मुख्य संग्राम कपाले यांच्या समवेत जम्बो कोविडच्या ICU, o२ व इतर वॉर्ड च्या रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
रुग्णांना औषध उपचार, जेवण, त्याचा दर्जा, डॉक्टरांशी संवाद व टॉयलेटची साफसफाई यासंबंधी प्रत्येकाशी विचारपूस केली. त्यानंतर टॉयलेटस्, स्वच्छतागृह याची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर बाहेर रुग्णांचे नातेवाईक यांचेशीसुध्दा प्रत्यक्ष संवाद साधला व त्यांना विश्वास दिला.
आतील रुग्णांची मनपामार्फत चांगल्या प्रकारची सोय, औषध उपचार करण्यात येत आहे. जम्बो कोविडमध्ये आयुक्त यांनी सुमारे १ तास सगळ्या गोष्टींची प्रत्यक्ष पाहणी व माहिती घेतली व संबंधितांना आवश्यक त्या सूचना सक्त ताकीद दिल्या.


















