न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. २०) रोजी २५६३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २२०६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे १९ पुरुष – चिंचवड (४४, ५८ वर्षे), रहाटणी (७३, ६४ वर्ष), भोसरी (७३, ६५ वर्षे), रावेत (४८ वर्षे), मोशी (६५ वर्षे), किवळे (७० वर्षे), चिखली (६०, ४५ वर्षे), वाकड (५६ वर्षे), काळेवाडी (१९ वर्षे), आकुर्डी (३५ वर्षे), दापोडी (७५ वर्षे), थेरगाव (७६,३७ वर्षे), फुगेवाडी (४८ वर्षे), पिपरी (४१) १३ स्त्री – सांगवी (७० वर्षे), थेरगांव (७३, ४४), चिखली (५५,५७,१४ वर्षे), पुनावळे (६५ वर्षे), दिघी (५० वर्ष), भोसरी (६७ वर्षे), पि. गुरव (७५ वर्षे), चिंचवड (४६), वाल्हेकरवाडी (८६ वर्षे), निगडी (४० वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे १५ पुरुष – जुन्नर (३५ वर्षे), पुणे (५८, ५८ वर्षे), भवानी पेठ (५८), हडपसर (३५ वर्षे) बावधन (३७ वर्षे), देहूरोड (६८, ५२ वर्षे), लोहगांव (७३ वर्षे), शिरुर (७५ वर्षे), बोपोडी (६८ वर्ष), खडकी ( ४५ वर्षे), बिदर (४१ वर्षे, वडगांव बुद्रुक (५४ वर्षे), दत्तवाडी (६८ वर्षे), ०७ स्त्री- नाशिक (५५ वर्षे), पुणे (३९ वर्ष), सिंहगड रोड (५८ वर्षे), बावधन (४७ वर्षे), येरवडा (६५ वर्षे) येथील रहिवासी आहे. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात १८ मृत्यु झालेले आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १८८५८८ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १६२८७० वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २४४४ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – २७३, ब – ३९८, क – २७७, ड – ३७५, इ – ४४८, फ – २११, ग – ३२६, ह – २५५ एकुण – २५६३.

















