- शहरातील सहापैकी एक शवदाहिनी राहणार १० दिवसांसाठी बंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या विद्युत व गॅस दाहिनीमध्ये, मागील महिन्यापासून सतत शवदहन होत असल्याने त्यामध्ये काजळी निर्माण होऊन नादुरुस्त होण्याच्या परिस्थितीत आलेल्या आहेत. त्यामुळे सर्व दाहीनीतील फर्नेसचे देखभालीचे कामकाज करणे अत्यंत आवश्यक झालेले आहे, तथापी सद्या कोविड शवांचे प्रमाण अधिक असल्याने गैरसोय होउ नये म्हणुन शहरातील सहा पैकी एक एकच शवदाहिनी १० दिवसांकरिता बंद ठेऊन अंतर्गत देखभालीचे कामकाज येणार आहे.
दाहिनीचे तापमान खूप अधिक असल्याने ते काम करण्याइतपत थंड होण्याकरिता तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. तसेच कामकाज झाल्यानंतर दाहिनीचे शव दहना इतपत तापमान वाढण्याकरिता दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. ह्या सर्व बाबींचा विचार करून शहरातील एकूण सहा फर्नेसचे अंतर्गत देखभालीचे कामकाज कालावधीचे खालील प्रमाणे नियोजन करण्यात आलेले आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे
विद्युत व गॅस दहीनीचे फर्नेस देखभाल दुरुस्तीकरिता बंद करावयाचा कालावधी तपशील….
ठिकाण फर्नेस बंद कालावधी
चिंचवड लिंकरोड दाहिनी – फर्नेस क्र.२ दि.२१ ते ३० एप्रिल २०२१
चिंचवड लिंकरोड दाहिनी – फर्नेस क्र.१ दि. १ मे ते १० मे २०२१
निगडी विद्युत दाहिनी फर्नेस क्र १ दि. ११ मे ते २० मे २०२१
निगडी विद्युत दाहिनी फर्नेस क्र २ दि. २१ ते ३० मे २०२१
भोसरी विद्युत दाहिनी दि .०१ ते १० जून २०२१
सांगवी गॅस दाहिनी दि .११ ते २० जून २०२१

















