- मुख्य लेखापरिक्षक, लेखाधिकारी, उपअभियंत्यांचा समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२१) :- शहरातील खाजगी रुग्णालयातील वैद्यकिय बिलांचे पुर्व / अंतिम लेखापरिक्षण करणेबाबत कोविड -१९ उपचारासाठी मनपाने शंभराहून अधिक रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून मंजूरी दिलेली आहे. तेथील बेड मॅनेजमेंटसाठी माहिती मिळणे यासाठी कनिष्ठ अभियंता यांची समन्वयक म्हणून नेमणूक केलेली आहे.
अशा रुग्णालयात दाखल झालेल्या कोविड बाधित रुग्णांची वैद्यकीय बिले वाजवीपेक्षा अधिक आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य लेखापरिक्षक आमोद कुंभोजकर यांची नियंत्रण प्रमुख व त्यांच्या सोबत किशोर बाबुराव शिंगे, लेखाधिकारी, पद्माकर नारायण कानिटकर, लेखाधिकारी यांची तसेच तांत्रिक बाबींसाठी दिपक पाटील, संजय काशिद, उपअभियंता यांची नेमणूक करणेत आलेली आहे.
प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय आठ पथके निर्माण केलेली आहेत. प्रत्येक पथकामध्ये त्या क्षेत्रीय कार्यालयातील जेष्ठ वैद्यकीय अधिकारी, लेखाधिकारी, लेखापाल, उपलेखापाल, मुख्य लिपिक, लिपिक व कनिष्ठ अभियंता असे प्रत्येकी आठ जणांचे पथकाचे कामकाज दि. १९ /०४ / २०२१ पासून सुरु केलेले आहेत. या पथकाकामार्फत पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी हॉस्पिटल मध्ये शासकीय दरानुसार बिल आकारले जाईल याबाबत पुर्व पडताळणी ( प्री – ऑडीट ) करणे. हॉस्पिटलचे प्रथम ड्राफ्टबिल दिलेनंतर त्याची तपासणी नियुक्त केलेल्या ऑडीट पथकामार्फत ऑडीट केल्यानंतर रुग्णाला अंतिम बिल देणेबाबत रुग्णालयांना सूचना देणे. खाजगी रुग्णालयामार्फत आकारल्या जाणाऱ्या सर्व देयकांचे पथकामार्फत लेखापरिक्षण करणे. बीलांमध्ये निदर्शनास येणाऱ्या त्रुटींचे जागेवरच वेळीच निराकरण करणे. नव्याने खाजगी रुग्णालये अधिग्रहित केल्यास त्याबाबतही अशाच पध्दतीने कार्यवाही करणे.