- जिल्हा प्रशासनाच्या सहयोगाने २२ टन ऑक्सिजन उपलब्ध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड मनपाच्या जम्बो कोविड, ऑटो क्लस्टर व इतर रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा गेल्या २ दिवसापासून जाणवत होता. परंतू, ऑक्सिजन संपला अशी परिस्थिती नव्हती. आयुक्त राजेश पाटील यांच्या निर्देशानुसार ऑक्सिजन समन्वयक स्मिता झगडे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या विशेष सहकार्यामुळे मंगळवारी (दि. २०) रोजी रात्री तीन टॅकरद्वारे सुमारे २२ टन ऑक्सिजन मे. सहानी, मे.आयनॉक्स व मे.एअर लिक्वीड यांचेमार्फत उपलब्ध करुन घेतला आहे.
सद्यस्थितीमध्ये जम्बो कोविड, अँटो क्लस्टर, गवळी माथा व इतर ठिकाणी असलेल्या कोविड सेंटरला आवश्यक तेवढा ऑक्सिजनचा साठा उपलब्ध करुन घेतला आहे. तसेच वेळोवेळी असा साठा उपलब्ध व्हावा यासाठी अन्न व औषध प्रशासन सोबत समन्वय ठेवून ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध करुन घेण्याचे काम अविरत चालू आहे. तसेच खाजगी रुग्णालयांसाठी समन्वयक स्मिता झगडे यांनी ऑक्सिजन पुरवठ्यासंबंधी आलेले सर्व फोन कॉल स्विकारुन संबंधित खाजगी रुग्णालयांना देखील ऑक्सिजनचे जम्बो सिलेंडर उपलब्ध करुन दिलेले आहेत. मंगळवारी रात्री (दि.२०) रोजी ऑक्सिजन नाही म्हणून कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडलेली नाही.
इंगळे सतिश नवलसिंग – कार्यकारी अभियंता-9922501726, ओंभासे प्रमोद सुधाकर – कार्यकारी अभियंता- 9922501756, खोंद्रे मोहन ईश्वरा – उपअभियंता – 9922501814, पाडवी संदिप गोपाळ -कनिष्ठ अभियंता-8380059428 धडस अमोल रामचंद्र – कनिष्ठ अभियंता-9552325206, पवार दिग्विजय दिनकरराव – कनिष्ठ अभियंता-8380059407 गायकवाड संभाजी बाळासाहेब – कनिष्ठ अभियंता-8007055115 गुंडाळ चंद्रकांत रामदास – कनिष्ठ अभियंता-8888844222 धुमाळ प्रविण बाळासाहेब – कनिष्ठ अभियंता-9922501270. सद्यस्थितीमध्ये समन्वय अधिकारी यांचे नियंत्रणाखाली व सुचनेनुसार कोविड -१९ अंतर्गत ऑक्सिजन व्यवस्थापन समिती यांची पाहण्यासाठी वरीलप्रमाणे नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर करपे दिपक रामदास-उपअभियंता-9922501124, बहाद्दरपुरे सुहास काशिनाथ-सहा. समाजविकास अधिकारी-9850433318 यांनी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे व अन्य शासकीय कार्यालय यांचे अधिकारी संपर्कात राहून कामकाज पहावे.