न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मोशी (दि. २५ डिसें.) :- मोशी-प्राधिकरण येथील गॅलक्सी किड्स प्री. प्रायमरी स्कूलमध्ये सोमवार (दि. २४) रोजी ख्रिसमस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका माधवी जनार्धनन, विद्यार्थी, पालक व शाळेच्या शिक्षिका आदी उपस्थित होते.
शाळेतील विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका माधवी जनार्धनन यांनी येशू ख्रिस्तांच्या जन्माविषयी माहिती तसेच नाताळाचे महत्व समजावून सांगितले. शेवटी सांताक्लॉजच्या हस्ते केक कापून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. येशूच्या गीतांवर विद्यार्थ्यांनी गीत गायन, नृत्य सादर केले. सर्व विद्यार्थ्यांनी या पार्टीचा आनंद घेतला.










