न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. २२) रोजी २५३९ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २१५६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे १८ पुरुष – मोशी (४०,६२ वर्षे), पिंपळे सौदागर (४२,६८ वर्षे), च-होली (३८ वर्षे), काळेवाडी (३४ वर्षे), निगडी (४८ वर्षे), रहाटणी (५०,४० वर्षे), पिंपरी (४५,३३,६३ वर्षे), चिखली (६६ वर्षे), किवळे (९० वर्षे), पिं.निलख(५६ वर्षे), चिंचवड (६९ वर्षे), वाल्हेकरवाडी (६३ वर्षे), पिंपळे गुरव (५९ वर्षे) : १४ स्त्री – निगडी (६५ वर्षे), आकुर्डी (७५ वर्षे), भोसरी (६५ वर्षे), थेरगांव (७०,७९ वर्षे), पिंपरी (६८,४५,५२,८० वर्षे), चिंचवड (७४ वर्षे), रावेत (७२ वर्षे), मोरवाडी (४५ वर्षे), पिंपळे सौदागर (५८ वर्षे), सांगवी (६५ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ११ पुरुष – गोरखपूर (७१ वर्षे), हिंजवडी (६५ वर्षे), खेड (७६,५६,५९ वर्षे), कोथरुड (४१ वर्षे), औंध (५२ वर्षे), खडकी (७३ वर्षे), येरवडा (७२ वर्षे), आळंदी (६७ वर्षे), शिरुर (४६ वर्षे) : ११ स्त्री – येरवडा (६० वर्षे), कोंढवा (३२ वर्षे), कुसगांव (५६ वर्षे), घाटकोर (४८ वर्षे), बालेवाडी (६३ वर्षे), बिबेवाडी (५५ वर्षे), वाघोली (७४ वर्षे), चाकण (८५,५५ वर्षे), वडगांव शेरी (४६ वर्षे), तळेगांव (५० वर्षे) येथील रहिवासी आहे. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात १२ मृत्यु झालेले आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १९३५१२ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १६७४०२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २५०८ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – २२७, ब – ३५२, क – २८२, ड – ३९६, इ – ४४६, फ – ३०५, ग – ३२५, ह – २०६ एकुण – २५३९.