होम क्वारंटाईनचा शिक्काही बसणार; पिं. चिं. पोलिसांची नामी शक्कल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाउनमध्येही विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची पोलीस थेट करोना टेस्ट करत असून, अनेकजण पॉजिटिव्ह आढळून आल्याने, पोलिसांकडून त्यांच्या हातवार होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जात आहे.
तर, ज्यांना प्रादुर्भाव जास्त आहे त्यांना रुग्णालयात भरती केली जात आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे यांनी दिली आहे. नागरिकांना त्याच्या आसपास फिरणाऱ्या व्यक्तींपासून करोनाचा धोका असू शकतो, असं सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे यांनी म्हटलं आहे. त्यामुळं प्रत्येक नागरिकाने सोशल डिस्टसिंग आणि मास्क वापरून करोनापासून स्वतःचा बचाव केला पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलं आहे.