- अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल; जीवित व मालमत्तेचे नुकसान?
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२१) :- थेरगाव परिसरात फटाक्याच्या कारखान्यात स्फोट होऊन मोठी आग लागली आहे. शनिवारी (दि. २४) रोजी दुपारी तीनच्या सुमारास हा स्फोट झाला. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
या स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की, या कारखान्या शेजारी असलेल्या आजूबाजूच्या घरांना तडे गेले आहेत. तर, काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. थेरगावाजवळील ग्रीन्स सोसायटी इमारती जवळ हा फटका कारखाना आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाचे बंब दाखल झाले असून जीवित व मालमत्तेच्या नुकसानीबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.


















