न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. २४) रोजी २४७३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १४१७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १९८४०२ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १७०६५२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २६१० जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ३३ पुरुष – पिं. गुरव (८२,७५,६५ वर्षे), चिखली (४१,३६ वर्षे), काळेवाडी (६३ वर्षे), वाकड (६७,७१,७७ वर्षे), दिघी (५३ वर्षे), थेरगाव (५२ वर्षे), चिंचवड (४९,६४ ,६५,४० वर्षे), पिं. निलख (८५ वर्षे), रावेत (५२ वर्षे), च-होली (४६ वर्षे), पिंपरी (५४,५९,३६ वर्षे), आकुर्डी (७६ वर्षे), पिं. सौदागर (३८,५२ वर्षे), भोसरी (३०,६५,६७ वर्षे), रहाटणी (८५ वर्षे), निगडी (७३,६८ वर्षे), बोपखेल (७२ वर्षे), सांगवी (५२ वर्षे), नेहरुनगर (७८ वर्षे), : १६ स्त्री – आकुर्डी (६५ वर्षे), वाकड (७२ वर्षे), रहाटणी (५० वर्षे), भोसरी (५८,७३,६२,५५ वर्षे), पिं. गुरव (६९ वर्षे), कासारवाडी (५० वर्षे), पिंपरी (६६ वर्षे), पिं.सौदागर (५२ वर्षे), थेरगाव (५४ वर्षे), च-होली (७२,६६ वर्षे), काळेवाडी (५९वर्षे), सांगवी (५८ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे २४ पुरुष – चाकण (६३,६१,४३, ३८,३८ वर्षे), मांजरी (५० वर्षे), थेऊर (५९ वर्षे), कात्रज (६० वर्षे), देहुगाव (४३ वर्षे), शिरुर (५५, ६८ वर्षे), खेड (५८ वर्षे), पुणे (५२, ५१,४५, ४९ वर्षे), राजगुरुनगर (५८ वर्षे), मुंढवा (३८ वर्षे), जुन्नर (५८ वर्षे), खराडी (७४ वर्षे), येरवडा (५३ वर्षे), अहमदनगर (४१,८० वर्षे), हडपसर (६० वर्षे) ०८ स्त्री – येरवडा (६३,७१,७० वर्षे), लोहगाव (४३ वर्षे), रहाटा (४० वर्षे), पुणे (७८,५५ वर्षे), सातारा (६५ वर्षे), येथील रहिवासी आहे. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात १२ मृत्यु झालेले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – २२९, ब – ४७३, क – २२५, ड – ३५४, इ – ४००, फ – २७२, ग – २५०, ह – २७०, एकुण – २४७३.