न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२१) :- चिखली नेवाळे वस्ती परिसरातील घरकुल मार्केटजवळ उद्या रविवार (दि. २५) एप्रिल रोजी स्टुडंटस् अॅकाडमीच्या वतीने सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदान करणार्या प्रत्येक रक्तदात्यास वाफेचे भांडे तसेच मास्क विनामुल्य भेट दिले जाणार आहेत. या रक्तदान शिबिराचे आयोजन पुण्यातील जहांगीर हॉस्पिटल यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील इच्छूक रक्तदात्यांनी हे शिबिर यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन प्रा. विजय सोनावले यांनी केले आहे.

















