- पिं. चिं. शहरात आज १२९३ जणांना बाधा; ९३ रुग्णांचा मृत्यू तर, २४६९ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. २६) रोजी १२९३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २४६९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २०१९६० वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १७५१४८ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २७२३ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ३८ पुरुष चिंचवड (६८ ,५५,६३,३९,३७ वर्षे), पिंपरी (७१,५४,४८ वर्षे), रहाटणी (५३,५४ वर्षे), थेरगाव (३५,३७ वर्षे), पिं. गुरव (९७,७५ वर्षे), वाकड (६५,२६,४७ वर्षे), मोशी (७२ वर्षे), पिं. सौदागर (५७ वर्षे), कासारवाडी (७३ वर्षे), भोसरी (५९,७८ वर्षे), वाल्हेकरवाडी (५२ वर्षे), चिखली (७२, ३८ ,३७,२९ वर्षे), सांगवी (६१,४९,६६ वर्षे), आजमेरा (७७ वर्षे), निगडी (५६ वर्षे), दापोडी (७२ वर्षे), फुगेवाडी (५० वर्षे), वल्लभनगर (६४ वर्षे), शाहुनगर (६२ वर्षे), किवळे (४९ वर्षे) – १६ स्त्री- चिखली (६७ वर्षे), दापोडी (५८ वर्षे), सांगवी (६३,४० वर्षे), काळेवाडी (४२ वर्षे), संत तुकारामनगर (५५,६५ वर्षे), निगडी (५८ वर्षे), भोसरी (५४,६९,५५ वर्षे), थेरगाव (५६ वर्षे), मोशी (६० वर्षे),पिं. गुरव (६० वर्षे), कासारवाडी (८० वर्षे), दिघी (३५ वर्षे), येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे २५ पुरुष – आळंदी (५२,३८ वर्षे), धाणोरी (५२ वर्षे), हिंजवडी (७५ वर्षे), नाशिक (३३ वर्षे), पाईट (४१ वर्षे), पुणे (५३,३७,७३, ६६ वर्षे), पानशेत (३३ वर्षे), बारामती (४२ वर्षे), चाकण (५८ वर्षे), लोणीकंद (७८ वर्षे), देहुगाव (६१ वर्षे), लोहगाव (६१ वर्षे), पर्वती (८० वर्षे), खडकी (६८ वर्षे), दौंड (६५ वर्षे), बाणेर (८० वर्षे), खेड (५५ वर्षे), लोणावळा (४७ वर्षे), धायरी (४१ वर्षे), धणकवडी (६२ वर्षे), मुंढवा (६० वर्षे), १४ स्त्री – विमाननगर (४९ वर्षे), आंबेगाव (६५ वर्षे), खेड (५५, ६०, ५७ वर्षे), शिक्रापुर (४७ वर्षे), लोहगाव (८०,४६ वर्षे), पुणे (६४, ७६ वर्षे), वडगाव (७० वर्षे), सहकारनगर (५४ वर्षे), तळेगाव (७८ वर्षे), देहुरोड (६५ वर्षे) येथील रहिवासी आहे. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात २० मृत्यु झालेले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – १२०, ब – १९३, क – १२१, ड – २५५, इ – २२८, फ – १२७, ग – १०२, ह – १४७, एकुण – १२९३.