न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२१):- पिंपरी-चिंचवड महापालिकेने वंचित घटकातील लोकांना तीन हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. ही मदत मिळविण्यासाठीचे निकष महापालिकेने निश्चित केले आहेत.
त्यात शहरातील परवानाधारक रिक्षाचालक, पथविक्रेते, घरेलु कामगार, बांधकाम मजूर, चर्मकार (गटई कामगार), नाभिक, शालेय विद्यार्थी वाहतुक करणारे चालक, जिम ट्रेनर, लोक कलावंत आणि बँड पथक यांचा समावेश आहे.
यात शहरातील पथविक्रेते यांना महापालिकेकडून मिळालेल्या परवान्याची आणि पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेअंतर्गत महापालिकेने दिलेल्या शिफारस पत्रांची झेरॉक्स द्यावी लागणार आहे. परवानाधारक रिक्षाचालकाला अर्जासोबत आरटीओकडून मिळालेल्या बॅच बिल्ला आणि लायसन्स, वाहन नोंदणी प्रमाणपत्राची (आरसी), रिक्षा परमिटची झेरॉक्स द्यावी लागणार असून सत्यप्रत आवश्यक आहे. चर्मकारला दुकान परवान्याची झेरॉक्स ( शॉपऍक्ट परवाना प्रत), शासकीय, महापालिकेचे नोंदणी प्रमाणपत्र (असल्यास), नाभीक दुकान परवान्याची झेरॉक्स ( शॉपऍक्ट परवाना प्रत), एका दुकानासाठी जास्तीत जास्त पाच कामगारांना अर्थसहाय्य देय राहील, शालेय विद्यार्थी वाहतुक करणारे वाहन चालक (शाळेच्या पे-रोलवरील वगळून) आरटीओकडून मिळालेल्या परवान्याची आणि लायसन्सची झेरॉक्स, शाळेचे मान्यता पत्राची सत्यप्रत, जिम व्यावसायिक शॉपऍक्ट लायसन्सची झेरॉक्स, एका जिमसाठी जास्तीत जास्त पाच जिम ट्रेनर यांना अर्थसहाय्य देय राहील, जिम ट्रेनरने किमान सहा महिने कालावधीचा जिम ट्रेनर कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
बांधकाम मजूर यांना शासकीय नोंदणी प्रमाणपत्राची झेरॉक्स (कामगार आयुक्त यांच्याकडील नोंदणी, नोंदणी शुल्क भरल्याची पावती) आणि बँड पथक यांना दुकान परवान्याची झेरॉक्स ( शॉपऍक्ट परवाना प्रत), एका पथकासाठी जास्तीत जास्त पाच वाजत्री कलाकारांना अर्थसहाय्य देय राहील. सर्वांना योजनेचा लाभ घेण्यासाठी महापालिका हद्दीतील रेशनकार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्राची सत्यप्रत अर्जासोबत जोडावी लागणार आहे. लोककलावंत यांना लोककलावंत असल्याबाबतचे शासकीय नोंदणी प्रमाणपत्राची झेरॉक्स किंवा नोंदणीकृत नाट्यकला संस्कृतीक क्षेत्राशी संबंधित, अधिकृत संस्थेशी निगडीत कलावंत सभासद असल्याबाबतचा पुरावा आवश्यक, घरेलू कामगारांना घरेलू कामगार शासकीय नोंदणी प्रमाणपत्राची झेरॉक्स (कामगार आयुक्त यांच्याकडील नोंदणी, नोंदणी शुल्क भरल्याची पावती) देणे बंधनकारक आहे.















