- प्रतिदिन चारशे ते साडेचारशे नवीन रुग्णांची भर..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२१) :- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून चिंचवड, काळेवाडी, वाकड, पिंपळे – निलख, पिंपळे – सौदागर, पिंपळे – गुरव, सांगवी भागात अधिक रुग्ण सापडले आहेत. या भागातील ११ गृहनिर्माण सोसायट्यांना सील केले आहे.
कोरोनाचा संसर्ग खंडित करण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली आहे. महापालिका विविध उपाययोजना करत आहे. रुग्णाच्या संपकातील व्यक्तींची तपासणी केली जात आहे. संपर्कातील व्यक्तींना क्वॉरंटाइन करून कंटेन्मेंट झोन जाहीर केले जात आहेत. महापालिकेच्या ‘ ड ‘ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव भागात सर्वाधिक आहेत.
क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या पिंपरीगाव, थेरगाव, गणेशनगर, रहाटणी भागात ३ हजार ७५० आणि ‘ ब ‘ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या रावेत, किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड प्रभागात ३ हजार ३०० रुग्ण आहेत. वाकड, पिंपळे – निलख, पिंपळे – सौदागर, पिंपळे – गुरव या भागात प्रतिदिन चारशे ते साडेचारशे नवीन रुग्ण आढळत आहेत. हा भाग गृहनिर्माण संस्थांनी व्यापला आहे.