- एक इंजेक्शन तब्बल चाळीस हजारांना..
- सापळा लावून दोघांना पोलिसांनी केले गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२१) :- नेहरूनगर येथील एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या महिलेच्या मदतीने आरोपींनी रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवून त्याचा काळाबाजार केला. तसेच एक इंजेक्शन तब्बल ४० हजारांना विकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सापळा रचून दोघांना इंजेक्शन खरेदीच्या बहाण्याने बोलावून त्यांना रंगेहाथ पकडले.
आरोपींकडून साडेसात हजारांचे दोन मोबाईल फोन, एक हजार रोख रक्कम, ४ हजार ३८९ रुपयांचे दोन रेमडेसिवीर इंजेक्शन आणि एक दुचाकी असा एकूण ६२ हजार ८८९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत औषध निरीक्षक भाग्यश्री यादव यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राहुल कल्याण बोहाळ (वय २८), विजय गणेश शिरसाठ (वय २९, दोघे रा. विजयनगर, काळेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्यासह त्याची साथीदार ज्योती कोकणे/लगड (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत औषध निरीक्षक भाग्यश्री यादव यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.