- शववाहिका स्मशानभूमी समन्वयासाठीही संपर्क क्रमांक जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील कोरोना बाधित रुग्णांना तातडीने आवश्यकता असल्यास रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, यासाठी पालिकेने अँम्ब्युलन्स निःशुल्क सेवेबाबत १०८ / ०२०-६७३३११५४ /०२०-६७३३२१०१ हा व शववाहिका स्मशानभूमी समन्वय सेवेसाठी ०२०-६७३३११५५ हे संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत.
महानगरपालिका व BVG MEMS (Maharashtra Emergency Medical Services) यांच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा पुरविण्यात येणार आहे. यापुर्वी सगळ्यांना ज्ञात असलेला १०८ क्रमांक व मनपा ०२०-६७३३११५४ / ०२०-६७३३२१०१ या क्रमांकावर फोन केल्यास तातडीने अँम्ब्युलन्स सेवा उपलब्ध होणार आहे. जेणेकरुन कोरोना बाधित रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचणे सोयीस्कर होणार आहे. ही हेल्पलाईन सेवा २४X७ व निःशुल्क उपलब्ध असणार आहे.