- युवा वॉरियर्सचाही रक्तदान मोहिमेत सहभाग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२१) :- भाजपा युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आ. तथा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत व आ. लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली “प्लाझ्मादान” अभियानाला सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी सरचिटणीस व प्रभाग स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी स्वतः प्लाझ्मादान करून अभियानाला सुरुवात केली. या अभियानात प्रामुख्याने प्रसाद कस्पटे, गणेश जवळकर, शिवराज लांडगे, रवी जांभुळकर, उदय गायकवाड, मंगेश धाडगे यांनी पुढाकार घेऊन हे अभियान यशस्वी केले. तसेच शहरातील इतर ठिकाणी रक्तदानाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रदेश उपाध्यक्ष व युवा वॉरियर्सचे संयोजक अनुप मोरे यांनी प्राधिकरण येथे व भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष प्रसाद कस्पटे यांनी कस्पटे वस्ती, वाकड येथे रक्तदान शिबीर घेऊन जवळपास ५० बाटली रक्त संकलन केले.
या अभियानाला माजी उपमहापौर शैलजाताई मोरे, प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, प्रदेश सदस्य अजित कुलथे, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस दिनेश यादव, गणेश जवळकर, उपाध्यक्ष शिवराज लांडगे, प्रसाद कस्पटे, पुजा आल्हाट, चिटणीस रवी जांभुळकर, प्रकाश चौधरी, मुक्ता गोसावी, मंडल अध्यक्ष उदय गायकवाड, सागर घोरपडे, सारिका माळी यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली.
















