- कष्टकरी संघर्ष महासंघाकडून राज्य शासनाचे आभार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२१) :- राज्यात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदित सुमारे १३ लाख बांधकाम कामगारांना पंधराशे रुपये अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू झाली.
पिंपरी-चिंचवड शहरातील कामगारानांही याचा लाभ मिळत आहे. संकटाच्या काळात राज्य शासनाने तातडीने रक्कम जमा केली. त्याबद्दल वर्किंग पिपल चार्टर, कष्टकरी संघर्ष महासंघाने राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले. कष्टकऱ्यांनी समाधान व्यक्त करीत आभार व्यक्त करीत घोषणा दिल्या.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष भास्कर राठोड, निरंजन लोखंडे, सुखदेव कांबळे, विनोद गवई, मनीषा ठाकर, चंद्रकांत जाधव, संगीता होले, मनीषा सावंत, सुनिता रोकडे, चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.