न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२१) :- लायन्स क्लब ऑफ तळेगांव यांच्या वतीने, तसेच लायन्स क्लब ऑफ भोसरी यांच्या विशेष सहकार्याने क्लबचे माजी प्रांतपाल व कमला शिक्षण संकूलाचे संस्थापक सचिव डॉ. दिपक शहा यांनी मानवतेच्या भूमिकेतून पिंपरीतील सीटी केअर हॉस्पीटल तसेच शाहूनगरच्या वेदान्त हॉस्पीटलला तीन मिनी व्हेन्टींलेटर रुग्णसेवेसाठी दिले.
डॉ. दिपक शहा यांच्या वतीने क्लबचे प्रांतपाल अभय शास्त्री याच्या हस्ते डॉ. अरविंद पाटील, डॉं. निलेश पाटील यांच्याकडे मिनी व्हेन्टींलेटर सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.
यावेळी तळेगांव लायन्स क्लबच्या अध्यक्षा प्रमिला वाळूंज, लिओच्या अध्यक्षा क्रांन्ती वाळूंज, भोसरी क्लबचे अध्यक्ष संजय बिराजदार, माजी अध्यक्ष अनिल झोपे, जिल्हाचे सचिव परमानंद शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
















