- आगाऊ रक्कम लावली परत करायला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२१) :- कोरोना महामारीत रुग्णवाहिका चालकांनी ठरलेल्या दरानुसार जादा रक्कम आकारू नये, असे स्पष्ट आदेश असतानाही पिंपरीतील एका महिलेकडून जादा पैसे घेणाऱ्या चालकास संबंधित महिलेस घेतलेले जादा पैसे परत करण्यास उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी भाग पाडले.
या रुग्णवाहिका चालकांनी या तक्रारदार महिलेकडून १८ हजार रुपये घेतले. अशी माहिती त्या महिलेने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास दिल्यानंतर संबंधित रूणवाहिका चालकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर कारवाई करून जादा बिलाची रक्कम परत करण्याच्या सूचना चालकाला करण्यात आल्या चालकाने संबंधित महिलेशी संपर्क साधून जादा घेतलेली रक्कम परत केली.
पिंपरी येथील एका महिलेच्या पतीस रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता होती. त्यानुसार शहरातील दोन ते तीन खासगी रुग्णालयात नेऊन आल्यानंतर पुन्हा वायसीएम रुग्णालयात आणले. मात्र, दुर्दैवाने त्या महिलेच्या पतीचे निधन झाले. दरम्यान, रुग्णवाहिका चालकाने त्या महिलेकडे १८ हजारांची मागणी केली. नाइलाजास्तव या महिलेला एवढी रक्कम भरायला लागली. दरम्यान, त्याची माहिती त्या महिलेने आरटीओ कार्यालयात दिली होती.