- पोलिसांचा छापा; लाखांचा ऐवज जप्त, दोघांवर गुन्हे..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२१) :- थेरगाव येथे आरोपीच्या घरात विनापरवाना अवैधरित्या आर्थिक फायद्यासाठी देशी-विदेशी दारुच्या बाटल्याची साठवणूक करुन विक्री केली जाते, अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास नखाते नगर, थेरगाव येथे सापळा रचून आरोपीच्या घरावर छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांनी विदेशी दारूचे सात बॉक्स त्यात ३३६ बाटल्या आणि देशी दारूचे २९ बॉक्स त्यात एक हजार ३९२ बाटल्या असा एकूण एक लाख ३३ हजार ९२० रुपयांचा दारुसाठा जप्त केला.
पोलीस नाईक गणेश कारोटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शामसिंग रामसिंग ठाकूर (वय ५०), निहाल मदन घमंडे (वय ३२, दोघे रा. नखाते नगर, थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.