- पिंपरी पोलीस चौकीत गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२१) :- फिर्यादी आणि त्यांचे इतर तीन सहकारी इंजिनिअर यांच्यासाठी कंपनीमार्फत जेवण बनविण्यासाठी आरोपीला स्वयंपाकी म्हणून नेमले होते. आरोपी स्वयंपाकी फिर्यादी यांच्याच फ्लॅटवर राहत असे. दरम्यान फिर्यादी यांनी कंपनीतील कामगारांच्या पगारासाठीचे ६० लाख रुपये त्यांच्या बेडरूममध्ये लाकडी कपाटात लॉकरमध्ये ठेवले होते.
बुधवारी दुपारी तीन ते सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आरोपीने बनावट चावीने कपाट आणि लाॅकर उघडून ६० लाख रुपये चोरून नेले. ही घटना महिंद्रा अॅटीया, नेहरूनगर, पिंपरी येथे बुधवारी (दि. २८) दुपारी घडली.
याबाबत अजित संजयकुमार राजहंस (वय ३१, रा. महिंद्रा अॅटीया, नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनोदकुमार राजकुमार यादव (वय २८, रा. कुमाडांडा, सदरापुर, बाराबंकी, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या चोरट्याचे नाव आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.