न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२१) :- महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना बाधितांची वाढती रूग्ण संख्या विचारात घेवून राज्यात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार १ मे २०२१ रोजीचा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार नसून पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे सकाळी ८ वाजता ध्वजारोहन समारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
या समारंभास पुण्याचे महापौर, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा त्यात समावेश आहे.