- पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२१) :- एक मे, महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दोन पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पाच पोलीस हवालदार आणि दोन पोलीस नाईक यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय, प्रशंसनीय कामगिरीबद्दल त्यांना हे पदक मिळाले आहे.
भोसरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, सांगवीचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे, क्राईम ब्रँच युनिट दोनचे पोलीस हवालदार शिवानंद स्वामी, पोलीस हवालदार सतीश कुदळे, पोलीस हवालदार किरण पवार, पोलीस हवालदार मंगलदास वालकोळी, , पोलीस हवालदार किरण आरुटे, पोलीस नाईक दत्तात्रय निकम यांना सेवेत सतत १५ वर्ष उत्तम सेवाभिलेख असल्याबद्दल पदक मिळाले आहे.
दरोडेखोर / गुन्हेगारांच्या टोळ्यांविरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल पोलीस उपनिरीक्षक महेश मतकर आणि संदीप बोरकर, राष्ट्रीय स्तरावरील खेळात प्राविण्य दाखविल्याबद्दल पोलीस नाईक रश्मी धावडे यांना देखील पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.