- उपचारादरम्यान मृत्यू; १७ जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मे. २०२१) :- – पती व मुलांसोबत झापलेल्या महिलेला भेटायला तिचा प्रियकर आला. त्यानंतर महिलेच्या मामेभावाने व त्याच्या साथीदारांनी प्रियकराला अपार्टमेंटच्या टेरेसवरून ढकलून दिले.
यात जखमी झालेल्या प्रियकराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी १७ जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरीगाव येथे शुक्रवारी (दि. ३०) ही घटना घडली.
अक्षय अनिल काशिद (वय २०, रा. पवारनगर, थेरगाव), असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी २८ वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कृष्णा बाळू पारधे उर्फ बाॅक्स, बाळ्या, तौसिफ, सचिन सौदाई, अजय टाक, जतीन मेवानी, अनिल पिवाल, कपील टाक, तरुण टाक, आतिश ननावरे, जय पिवाल, विनय बेद, सद्दाम शेख, खलील शेख, अरुण टाक, जतीन टाक, खूबचंद मंगतानी (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही), अशी आरोपींची नावे आहेत.