- चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मे. २०२१) :- चिखली येथील चिंचेचा मळा, धनगर बाबा मंदिरासमोर, किसन तुकाराम ताम्हणे यांच्या बाजरीच्या शेतामध्ये एका दिव्यांग बालकाला बेवारसपणे सोडले असल्याची माहिती चिखली पोलिसांना शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अज्ञातांनी एका तीन वर्षीय बालकाला उघड्यावर सोडून दिले होते. पोलिसांनी बालकाला ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
पोलीस कर्मचारी सचिन राम भिसे यांनी याबाबत शुक्रवारी (दि. ३०) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.