- आज २०३७ जणांना बाधा; ९७ रुग्णांचा मृत्यू तर, २३६८ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मे. २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. ०१) रोजी २०३७ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २३६८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २१२४६० वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १८७९३६ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २९७८ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ३२ पुरुष – २० स्त्री आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ३० पुरुष – १५ स्त्री आहेत. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ०९ मृत्यु झालेले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – १५१, ब – २९७, क – १७०, ड – ४२३, इ – २१४, फ – ३०३, ग – ३०४, ह – १७५, एकुण – २०३७.