- एकमेकांना मारहाण; दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मे. २०२१) :- दिघीतील मॅगझीन चौक परिसरातील ग्रोफर्स कंपनीमधील कामगार मिलिंद गोविंद नवसागर याने शुभम पवार याच्या कंपनीमधील कामांमध्ये चुका काढल्या. याचा राग मनात धरून शुभम व निरंजन यांनी मिलिंद यांना शिवीगाळ केली. शिवीगाळ करू नका, असे वानखेडे व कामगार दीपक यांनी सांगितले. त्यानंतर आरोपी कंपनीच्या बाहेर गेले.
त्यानंतर अन्य लोकांना कंपनीमध्ये घेऊन आले. आरोपींनी कंपनीत बेकायदेशीर जमाव जमवला. तसेच कंपनीतील कामगार मिलिंद नवसागर व दीपक कांबळे आणि वानखेडे यांना हाताने मारहाण केली.
कार्तिक संजय वानखेडे (वय १९, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दिली आहे. शुभम दिलीप पवार (वय १८), निरंजन दिलीप पवार (वय २०), दिलीप पवार (वय ५०), संतोष पवार (वय ३०), विजय पवार (वय २८, रा. दिघी), अशी आरोपींची नावे आहेत.