- जेनेरिक क्रांती काळाची गरज – माजी. खा. आढळराव पाटील..
- ‘Genericart medicine’ या जेनरिक औषधं ऑनलाईन ॲपचे अनावरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मे. २०२१) :- भारतात एकीकडे गरिबांसाठी सरकारी मोफत आरोग्यव्यवस्था असली तरी ब्रॅण्डेड औषधांमुळे रुग्णांना मोठी किंमत चुकवावी लागते. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग अशा आजारांवर नियमित व दीर्घकालीन औषधे आवश्यक असतात. या आजारांच्या रुग्णांना जेनेरिक औषधे उपलब्ध झाल्यास आर्थिक ताण नक्कीच कमी होईल, असे मत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.
सर्व सामान्य नागरिकांना कोरोना महामारीच्या काळात स्वस्त औषधे घरपोच मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने पिंपरीतील अजमेरा मोरवाडीतील व संभाजीनगर येथील सुजय स्वस्त औषधी सेवा जेनरिक मेडिकल स्टोअर्स ‘Genericart medicine Pvt limited या कंपनीच्या ऑनलाईन ॲपचे अनावरण मा. खा. आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपस्थित शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, शिवसेना जिल्हा ग्राहक संरक्षण प्रमुख शिवाजी राजगुरू, प्रा. दत्तात्रय भालेराव, सौ. वर्षा भालेराव, संतोष डोके, योगेश थोरात आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आढळराव पाटील म्हणाले, सरकारी रुग्णालयात जेनेरिक औषधेच दिली जातात. जेनेरिक औषधांच्या चळवळीसाठी GENERICART MEDICINE PVT LTD या कंपनीने या ‘Genericart medicine’ या ऑनलाईन ॲपची निर्मिती केली आहे. त्यामुळे आता ही औषध ऑनलाईनही विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा. ही औषधे शहरातील अजमेरा- मोरवाडी, संभाजीनगर परिसरातील सुजय जेनरिक मेडिकल स्वस्त औषधी सेवा दुकानात विक्रीसाठी उपलब्ध आहे.
सौ. वर्षा भालेराव माहिती देताना म्हणाल्या, सर्वसामान्य कुटुंबांमध्ये औषधांवर होणारा खर्च खूपच असतो आणि त्याचा परिणाम त्या कुटुंबाच्या प्रगतीवर होत असतो. मात्र, जेनेरिक औषधे ही ३० ते ८० टक्के स्वस्त दरात उपलब्ध आहेत. जेनरिक क्रांती होणे, ही काळाची गरज आहे. त्यासाठी ग्राहकांनीच पुढे आले पाहिजे व डॉक्टर यांनी देखील सहकार्य केले पाहिजे. जेनेरीकार्ट मेडिसिन प्रा.ली. ही भारतातील जेनेरिक व्यवसायातील एक अग्रगण्य कंपनी असून महाराष्ट्रासहित इतर सहा राज्यांमध्ये कार्यरत आहे. कंपनी १४०० पेक्षा जास्त शाखांतून ६५ लाख समाधानी ग्राहकांना सेवा देत आहे. कोविडच्या काळात जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहचता यावे आणि त्यांना घरपोच औषधे देता यावीत यासाठी कंपनीने ‘Genericart medicine Pvt limited या ॲपची निर्मिती केली. या माध्यमातून ग्राहकांना एका क्लिकवर हवी ती औषध मिळणार आहेत, तेही स्वस्तात.