- मात्र, लसीअभावी ४५ वर्षापुढील नागरिकांच्या लसीकरणाला खो…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३. मे. २०२१) :- शहरात १ मे पासून १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी लसीकरणाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पूर्व नोंदणी केलेल्या ६०० जणांना पहिल्या दिवशी लस देण्याचे नियोजन महापालिकेने केले होते. या पैकी ५५२ जणांनी पहिल्या दिवशी लस घेतली. लस घेण्यासाठी उत्साह दिसून आला.
नवीन जिजामाता रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, प्रेमलोक पार्क दवाखाना या तीन केंद्रावर १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू राहणार आहे. प्रत्येक केंद्रावर रोज २०० जणांचे लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या दरम्यान लसीकरण सुरू राहणार आहे. दरम्यान शनिवारी या तिन्ही लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमावर गर्दी झाली होती. अनेकांना लस मिळाली नाही. त्यामुळे लस न घेताच परतावे लागले.
शहरात लसीचा साठा उपलब्ध नसल्याने सोमवारी ४५ वर्षापुढील नागरिकांचे लसीकरण बंद राहणार आहे. रविवारी देखील या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद होते. सद्यस्थितीत शहरात लसीचा तुटवडा आहे. परिणामी शहरातील अनेक केंद्र बंद आहे. ज्यांनी कोविन एपवर नोंदणी केली आहे. त्यांनाच लस मिळत आहे. लसीच्या साठ्याअभावी सलग दोन दिवस ४५ पुढील नागरिकांचे लसीकरण बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
















