- आयुक्तांच्या भूमिकेवर नगरसेवकांकडूनच प्रश्नचिन्ह?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३. मे. २०२१) :- काविड सेंटरमधील वाढीव बिलाची चौकशी करण्याचा आदेश महापौर ढोरे यांनी दिला होता. त्यानंतरही प्रशासनाने चौकशी अहवाल सादर केला नसल्याने नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले.
त्यानंतर वाढीव बिलांचा चौकशी अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले. कोविड सेंटर गैरव्यवहार अहवाल सभागृह पटलावर का आला नाही. आयुक्तांचा धिक्कार असो. महापालिकेसमोर चौकशी अहवाल का ठेवला नाही.
ही बाब चुकीची व गंभीर आहे. आयुक्तांनी वेळेवर अहवाल सादर केला, असता तर आज ही वेळ आली नसती राजकारण करू नये, अशा प्रतिक्रिया नगरसेवकांनी सभेत उपस्थित केल्या.