- पालिकेचा शहरातील काळजीवाहकांना इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने कोरोना बाधितांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आवश्यक लाकुड/सरण उपलब्ध करण्यासाठी प्रति मृतदेह र.रु. सहा हजार याप्रमाणे संबंधित काळजीवाहक संस्थांना देण्यास मान्यता देण्यात आलेली होती.
तथापी स्थायी समितीने प्रति मृतदेह आणखी र.रु. दोन हजार वाढ म्हणजे प्रति मृतदेह एकुण आठ हजार रुपये देण्यास मान्यता दिलेली आहे. सर्व काळजीवाहक संस्थानी कोरोना बाधितांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी लाकुड/गोवऱ्या इ. उपलब्ध करुन देण्यासाठी जादा पैसे घेतले, अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित संस्थेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येवुन, संस्था ब्लॅकलिस्ट करण्यात येईल, असा इशारा पालिकेने दिला आहे.