न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३. मे. २०२१) :- अण्णासाहेब मगर बँकेचे अध्यक्ष प्रा. राजेश सस्ते यांचा वाढदिवस अत्यंत सध्या पद्धतीने कोणतेही कार्यक्रमाचे आयोजन न करता उत्साहाने साजरा करण्यात आला.
बँकेचे प्रमुख मार्गदर्शक नंदूकुमार लांडे यांनी प्रा. सस्ते यांना शुभेच्छा दिल्या. या कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगामध्ये वाईट वातावरण आहे. अशा अवघड काळामध्ये वाढदिवसाचे आयोजन न करता अत्यंत सध्या पद्धतीने साजरा करण्याचे निर्णय घेऊन वेगळा पायंडा पडला आहे. त्यांची ही कृती सहकारामध्ये आदर्श ठरणारे आहे.
बँकेचे उपाध्यक्ष मनोज बोरसे, जेष्ठ संचालिका सुलोचना भोवरे, दीपक डोळस, अॅड. घनश्याम खलाटे, गणेश पवळे, विजय गवारे, सोनल लांडगे, सविता मोहरुत, सी. इ. ओ. गजानन कुलकर्णी, अॅड. बाळासाहेब थोपटे, सी. ए. अमेय दर्वे, आदींनी शुभेच्छा दिल्या. शासनचे कोविड-१९ चे नियमांचे पालन करण्यात आले.
अध्यक्ष प्रा. सस्ते म्हणाले की, मी मोशीतील सामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्ता आहे. अप्पांनी माझावर ठेवलेले विश्वास मी सार्थ केल्याचा आनंद मला आहे. कोविड च्या ह्या काळा मध्ये सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन करणे ही सर्व कार्यकर्त्यांची जवाबदारी आहे, ती जवाबदारी मी पूर्ण करीत आहे. सभासद खातेदार, हितचिंतकांचा विश्वास सार्थ ठरवेन. उपाध्यक्ष मनोज बोरसे यांनी आभार मानले.