- पालिकेचा निर्णय; लॉकडाऊननंतर होणार अर्ज स्वीकृती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. मे. २०२१) :- लॉकडाऊन कालावधीत शहरातील घोषित, अघोषित झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या झोपडीधारकांना तीन हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. त्यासाठी कर भरल्याची पावती आणि लसीकरणाचे पत्र जोडणे बंधनकारक आहे. याबाबतच्या उपसूचनेला महासभेने मान्यता दिली.
शहरातील १८ हजार फेरीवाल्यांनाही मदत देण्याची उपसूचना महासभेने दिली आहे. या योजनेसाठी १५ मे पासून अर्ज भरता येणार असून महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात अर्ज स्वीकृत केले जाणार आहेत.
मदत मिळवण्यासाठी महापालिका हद्दीतील रेशनकार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्राची सत्यप्रत अर्जासोबत जोडावी लागणार आहे. या योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये ‘डीबीटी’ मार्फत थेट देण्यात येणार आहे.