- पालिकेकडून ऑनलाईन नोंदणीसाठीची प्रक्रिया जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून परिसरामध्ये वय वर्षे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी फक्त नोंदणी करुन Appointment घेतलेल्या लाभार्थ्यांनाच लसीकरण केंद्राच्या ठिकाणी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे.
या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी आज मंगळवारी (दि. ४) रोजी सायंकाळी ७.३० पुर्वी www.cowin.gov.in / Aarogya Setu App वरती पुर्व नोंदणी (Register yoursell) करणे आवश्यक आहे.
पुर्वनोंदणीसाठी सायंकाळी ७.३० वाजता उद्यासाठी Appointment घेण्याकरीता www.cowin gov In / Aarogya Setu App मध्ये Schedule मध्ये क्लिक करुन त्यानंतर Schedule now वर Click करावे. त्यानंतर पिन कोड टाकावा व सर्च करावे. आपणास उद्याची तारीख व वरील नमुद सेंटर च्या नावासमोर २०० इतकी संख्या दिसेल. २०० या संख्येवर Click करावे व कोणत्याही Time Slot ची निवड करावी व Appointment Confirm करावी अशा पध्दतीने Appointment मिळाल्यानंतर आपणास Appointment Schedule झाल्याचा संदेश प्राप्त होईल. (उपरोक्त नमूद पध्दती प्रमाणे Appointment साठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालय यासाठी ४११०२६, नवीन जिजामाता रुग्णालयासाठी ४११०१७ व प्रेमलोक पार्क दवाखाना यासाठी ४११०३३ हा पिन कोड वापरावा.) वरील तीन लसीकरण केंद्रांच्या ठिकाणची Appointment Book करुन लसीकरणाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा तसेच Appointment नसलेल्या नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही. नोंदणी न झालेल्या नागरीकांनी लसीकरण केंद्राच्या परिसरामध्ये गर्दी करु नये व सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.