- चिंचवड ब्लॉक काँग्रेसची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. मे. २०२१) :- चिंचवड ब्लॉक काँग्रेस व पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या उपनगरातील नागरिकांना घरपोच मृत्यूचा दाखला मिळाला पाहिजे, अशा मागणीचे निवेदन नुकतेच आयुक्तांना देण्यात आले.
कोरोना हा दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसत आहे. या आपत्तीच्या काळामध्ये अनेक कुटुंबातील नागरिकांचे निधन झालेले पाहावयास मिळत आहे. अशा परिस्थितीत महापालिकेने सर्व विभागातील आरोग्य अधिकारी व कर्मचारी व स्थानिक नगरसेवकांची मदत घेऊन मृत्यू पावलेल्या त्या गावातील उपनगरातील नागरिकांना घरपोच मृत्यूचा दाखला मिळालाच पाहिजे, जेणेकरून दाखल्यासाठी गर्दी टाळता येईल, अशी मागणी निवेदनातून केली गेली आहे.