- लसीकरणासाठी नावनोंदणी कशी करावी? वाचा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शहरात वय वर्षे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी फक्त नोंदणी करुन Appointment घेतलेल्या लाभार्थ्यांनाच लसीकरण केंद्राच्या ठिकाणी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे.
यासाठी पालिकेने यमुनानगर रुग्णालय, डोळ्यांचे हॉस्पिटल मासुळकर कॉलनी, पिंपळे निलख पी.सी.एम.सी स्कुल, नवीन आकुर्डी रुग्णालय, आहिल्यादेवी होळकर स्कुल सांगवी, प्रेमलोक पार्क दवाखाना, नवीन जिजामाता रुग्णालय व नवीन भोसरी रुग्णालय या लसीकरण केंद्रावर सोय केली आहे.
वय वर्षे १८ ते ४४ या वयोगटामधील नागरीकांनी आज बुधवारी सायंकाळी ७.३० पुर्वी www.cowin.gov.in / Aarogya Setu App वर पुर्व नोंदणी (Register yourselft) करावी. पुर्वनोंदणीनंतर सायंकाळी ७.३० वाजता उद्यासाठी (Appointment Di) घेण्याकरीता www.cowin.gov.in / Aarogya Setu App मध्ये Schedule मध्ये क्लिक करुन त्यानंतर Schedule now वर Click करावे. त्यानंतर पिन कोड टाकावा व सर्च करावे. आपणास उद्याची तारीख व वरील नमुद सेंटर च्या नावासमोर २०० इतकी संख्या दिसेल. २०० या संख्येवर Click करावे व कोणत्याही Time Slot ची निवड करावी व Appointment Confirim करावी. अशा पध्दतीने Appointment मिळाल्यानंतर आपणास Appointment Schedule झाल्याचा संदेश प्राप्त होईल.
या पध्दती प्रमाणे Appointment घेण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यमुनानगर रुग्णालय पिन कोड- ४११०४४, डोळ्यांचे हॉस्पिटल-मासुळकर कॉलनी पिन कोड -४११ ०१८, पिंपळे निलख पी.सी.एम.सी स्कुल पिन कोड- ४११ ०२७, नवीन आकुर्डी रुग्णालय पिन कोड -४११ ०३५, आहिल्यादेवी होळकर स्कुल सांगवी पिन कोड -४११ ०२७, प्रेमलोक पार्क दवाखाना पिन कोड- ४११०३३, नवीन जिजामाता रुग्णालय पिन कोड- ४११०१७ व नवीन भोसरी रुग्णालय पिन कोड -४११ ०२६ असा वापरावा. या आठही लसीकरण केंद्रांच्या ठिकाणची Appointment Book करुन लसीकरणाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच Appointment नसलेल्या नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही, नोंदणी न झालेल्या नागरीकांनी लसीकरण केंद्राच्या परिसरामध्ये गर्दी करु नये व सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.