मनपा स्विकृत सदस्य दिनेश यादव यांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६. मे. २०२१) :- चिखली, कुदळवाडी परिसरातील रहिवासी भागाला औद्योगिक विज वाहिन्यांपासून अलग करा, अशी मागणी मनपा स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी महावितरणकडे केली आहे. औद्योगिक वाहिन्यांवर देखभाल आणि दुरुस्तीच्या नावाखाली दर आठवड्याला आठ ते दहा तासाचे शट डाऊन घेतले जाते आणि त्यामुळे सदर भाग अंधारात असतो. तो टाळण्यासाठी औद्योगिक आणि रहिवासी भागाच्या विज वाहिन्या स्वतंत्र ठेवाव्यात असे यादव यांनी म्हटले आहे.
दर गुरुवारी रहिवासी भागातील विज पुरवठा देखभाल आणि दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवला जातो जे विज ग्राहकांवर अन्याय केल्यासारखे आहे.अखंडित विज पुरवठ्याच्या नावाखाली शहरातील ग्राहक विज बिलात अतिरिक्त पैसे मोजतात आणि त्याबदल्यात महिन्यात तीस तासापेक्षा जास्त काळ जर विज पुरवठा मिळत नसेल तर हा अन्याय आहे असे यादव यांनी नमूद केले आहे.महाराष्ट्र विज नियामक आयोगाने औद्योगिक आणि रहिवासी विज वाहिन्या स्वतंत्र ठेवण्याबाबत महावितरणला आदेश दिले असूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही आणि त्यामुळे कुदळवाडी,सेक्टर सोळा,जाधववाडी,चिखली भाग हा भोसरी आणि टेल्को महावितरण विज उपकेंद्रातील औद्योगिक वाहिन्यांवर अद्यापही आहे.
वाहिन्या स्वतंत्र करण्याची प्रक्रिया क्लिष्ट नसून,किरकोळ कामे केल्यास अंमलबजावणी करता येणे शक्य आहे. कोरोना काळात अनेक नागरिकांना वर्क फ्रॉम होम असल्याने विद्युत पुरवठ्यातील व्यत्यय अडचणीचा ठरत आहे,याशिवाय होम आयसोलेशन असलेल्या नागरिकांना प्रचंड उन्हाळ्यात विज नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत तीन दिवसापूर्वी एका करोना रुग्णांचा लाईट अभावी मुत्यु झाला तसेच चिखली भागातील सर्व हाँस्पीटल मध्ये विज गेल्यामुळे अनेक समस्या तोड द्यावे लागत आहेत.त्यामुळे महावितरण कंपनीने तातडीने रहिवासी भागांसाठी स्वतंत्र विज वाहिन्यांची व्यवस्था करून अखंडित विज पुरवठा देण्याचे कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन यादव यांनी केले आहे.