- शहरातून तीन दुचाक्यांची चोरी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. मे. २०२१) :- शहरात वाहन चोरटे सुसाट आहेत. शहरातून तीन दुचाकी चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी निगडी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
राजेश नाना जाधव (वय २३, रा. साईनाथनगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. ५) फिर्याद दिली आहे. फिर्यादीने त्यांची वीस हजार रुपये किमतीची दुचाकी राहत्या घरासमोरील रस्त्यावर लॉक करून पार्क केली होती. वाहन चोरीचा हा प्रकार मंगळवारी (दि. ४) सायंकाळी सात ते बुधवारी (दि. ५) सकाळी आठच्या दरम्यान घडला.
प्रवीण प्रकाश कश्यप (वय ३५ , रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. ५) फिर्याद दिली आहे. प्रिया जीने त्यांच्या सोसायटीच्या बाहेर १५ हजार व १७ हजार रुपये किमतीची, अशा दोन दुचाकी पार्क केल्या होत्या. वाहनचोरीचा हा प्रकार १ फेब्रुवारी ते २ मे २०२१ या कालावधीत घडला.