- एटीएममधून पैसे बाहेर न आल्यामुळे फिर्यादीची फसगत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. मे. २०२१) :- डेबिट कार्डची माहिती व ओटीपी विचारून खात्यातून दोन लाख १७ हजार रुपये काढून घेतले. हिंजवडी येथे ८ मार्च २०२१ रोजी आर्थिक फसवणुकीचा प्रकार घडला. संतोषकुमार बीरंदर तिवारी (वय ३६, रा. डांगे चौक, वाकड, मूळगाव मदीपुरा, अम्मा, मुजफ्फरापूर, बिहार) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. ५) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात मोबाईलधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पैसे काढण्यासाठी गेले त्यावेळी त्यांचे २० हजार रुपयांचे ट्रान्झेक्शन झाले. मात्र एटीएममधून पैसे निघाले नाहीत. परंतु पैसे कट झाला असल्याचा मेसेज आला. त्यामुळे फिर्यादीने कस्टमर केअरला फोन केला. परंतु त्यांनी फोन स्वीकारला नाही.
काही वेळातच त्यांना आरोपीने फोन केला. पंजाब नॅशनल बँकेतून बोलत आहे, असे आरोपीने फिर्यादीला सांगितले. कट झालेले पैसे परत खात्यात पाठवतो, असे खोटे बोलून आरोपीने फिर्यादीच्या डेबिट कार्डची माहिती व ओटीपी विचारला. त्यानंतर फिर्यादीच्या खात्यातून दोन लाख १७ हजार रुपये त्यांच्या संमतीविना लबाडीने काढून घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली.