- आरटीओने ठरविल्यापेक्षा अधिकची उकळली रक्कम..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. मे. २०२१) :- तुम्ही मला १४ हजार रुपये द्या. नाहीतर तुमच्या आईला रस्त्यावर ठेवून निघून जाईल अशी धमकी दिली. भाडे अडीच हजार रुपये ठरले असतानाही जादा पैशांची मागणी केली. महिलेने चौदा हजार रुपये दिले. पैसे स्वीकारत असताना आरोपीने महिलेच्या हाताला स्पर्श केला.
महिलेने हात झटकला असता आरोपीने पुन्हा हात पकडत चार आण्याची मुर्गी बारा आण्याचा मसाला असे म्हणत महिलेचा विनयभंग केला. हा प्रकार गुरुवारी (६ मे) सायंकाळी पाचच्या सुमारास बिर्ला हॉस्पिटल परिसरात घडला.
पीडित महिलेने या घटनेची तक्रार पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे केली. किशोर शंकर पाटील (वय ४५, रा. केशर अपार्टमेंट, साई चौक, नवी सांगवी) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत.