- वय १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील नागरीकांच लसीकरण सुरळीत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. मे. २०२१) :- शासनाकडून लस साठा उपलब्ध न झाल्यामुळे उद्या शनिवारी (दि.०८) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील वय वर्षे ४५ च्या वरील कोणत्याही नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही.
फक्त नोंदणी करुन Appointment घेतलेल्या वय वर्षे १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांनाच नेहमीच्या आठ केंद्रावर लसीकरण होणार आहे. त्यासाठी केंद्राच्या ठिकाणी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत उपस्थित रहावे, तसेच नोंदणी न झालेल्या नागरीकांनी लसीकरण केंद्राच्या परिसरामध्ये गर्दी करु नये व सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.


















