- आजपर्यंत २१ हजार अर्जदारांची रक्कम परत केल्याची पालिकेची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. मे. २०२१) :- पंतप्रधान आवास योजनेत नाव नसणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविण्यात आलेल्या गृहप्रकल्पाच्या निवड अथवा प्रतीक्षा यादीत नाव नसलेल्या अर्जदारांचे डिमांड ड्राफ्टचे पाच हजार रुपये परत देण्यास सुरुवात झाली आहे. आजपर्यंत २१ हजार अर्जदारांचे प्रत्येकी पाच हजार परत केले आहेत, अशी माहिती झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी दिली.
उर्वरित नागरिकांची पुढील आठवड्यात रक्कम बँकेत जमा होणार आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी गरिबी निर्मूलन मंत्रालयाच्यावतीने महापालिका क्षेत्रात आवास योजना पुढील आठवड्यात रक्कम बँकेत जमा होणार आहे.
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी गरिबी निर्मूलन मंत्रालयाच्यावतीने महापालिका क्षेत्रात आवास योजना राबविण्यात येत आहे. महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजना, सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत केंद्र सरकारने महापालिकेला ७२ हजार ३२६ घरकुलांचे उद्दिष्ट दिले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी च-होलीत १४४२, रावेतला ९३४ आणि बो-हाडेवाडी १२८८ असे एकूण ३ हजार ६४४ घरे बांधण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी महापालिकेने देशात कोठेही नावावर घर आणि तीन लाखांपेक्षा जास्त उत्पन्न नसलेल्या पिंपरी – चिंचवड शहारातील नागरिकांकडून अर्ज मागविले होते. सुमारे ४८ हजार अर्ज आले होते. अर्जासोबत पाच हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट घेतला होता.