- संतापलेल्या आरोपींची पोलिसांना मारहाण; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. मे. २०२१) :- कारवाई केल्याच्या रागातून पोलिसांना मारहाण केली या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. ही घटना गुरुवारी (दि. ६) सायंकाळी डुडुळगाव येथे घडली.
सागर बाळु गावडे (वय २८), सहजानंद निजानंद गावडे (वय २६) आणि सुरेश उत्तम कातडे (३०, तिघेही रा. आळंदी, ता. खेड, जि. पुणे) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस कर्मचारी हरिराम तुळशीराम डुमनर यांनी गुरुवारी (दि. ६) दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिघी पोलिसांनी डुडुळगाव येथे आरोपीच्या टेम्पोला थांबविले. त्यामुळे संतापलेल्या आरोपींनी आमच्याच पावत्या का करता. आमच्यावर कारवाई करणारे तुम्ही कोण, अशी विचारणा करीत पोलिसांना धक्काबुक्की आणि मारहाण केली. तसेच दगड घेऊन पोलिसांच्या अंगावर धावून आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे .