- पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. मे. २०२१) :- गेटमधून प्रवेश करीत चोरट्यांनी ७० हजार रुपयांच्या तांब्यांच्या तारा चोरून नेल्या. ही घटना चिंचवड येथे गुरुवारी (दि.६) सकाळी उघडकीस आली.
सुरज नंदकुमार कासार (३५, रा. काकडे पार्क, तानाजीनगर, चिचवड) यांनी गुरुवारी (दि. ६) याबाबत पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासार यांनी बुधवारी (दि.५) सायंकाळी ७० हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा असलेले १४ बॉक्स कंपनीत पॅक करून ठेवले होते. ते चोरटयांनी पळविले.