न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ डिसें.) :- पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची बुधवारी (दि. २६) रोजीची नियोजित बैठक गणसंख्येअभावी तहकूब करण्यात आली आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड यांच्यासह सदस्य विलास मडिगेरी, विकास डोळस आणि सागर अंगोळकर हे उपस्थित होते.
उर्वरित सर्व सदस्य बैठकीला गैरहजर राहिल्याने ही बैठक येत्या १ जानेवारीपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. परंतु, स्थायीच्या सदस्यांनी अचानक दांडी मारल्याने तहकूब झाल्याने ऊलट सूलट चर्चा रंगली आहे.
या बैठकीपुढे पाच ठिकाणी अर्बन पार्क स्ट्रीट विकसित करणे, सुदर्शनगर वाढीव खर्च, पाणीपुरवठा वितरणासाठी सल्लागार नेमणुकीसह विविध सल्लागार नेमणुकीचे प्रस्ताव होते. त्यात पाण्यासाठी सल्लागार नेमणूक हा विषय वादाचा ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, मागील बैठकीत चिखलीतील ४५ कोटी रुपयांच्या खर्चाचा संतपीठाचा विषय स्थायी समितीने मंजूर केला होता. परंतु, त्याच्या मंजुरीबाबत काही सदस्य अनभिज्ञ असल्याचे पुढे आले होते.










