- १४ एप्रिलनंतरच्या वाहनांची होणार नोंदणी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १०. मे. २०२१) :- राज्यात संचारबंदी लागू होण्यापूर्वी विक्री झाली. मात्र, आरटीओत नोंदणी होऊ न शकलेल्या ट्रान्सपोर्ट संवर्गातील वाहनांची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यास परिवहन आयुक्त कार्यालयाने परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात हा निर्णय घेण्यात आला आहे.
अद्यापि मोशी येथी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एकही अर्ज प्राप्त झाला नसल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. राज्य शासनाने १४ एप्रिलपासून संचारबंदी लागू आहे. त्या पूर्वी नागरिकांनी वाहनांची खरेदी केली. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहने घरी नेणाऱ्या नागरिकांनी अगोदरच वाहने
बुक करून ठेवली होती. या वाहनांचे खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले आहेत. मात्र, १४ एप्रिलनंतर नोंदणी होऊ शकली नाही. या वाहनांची नोंदणीसाठी नोंदणी व्हावी, यासाठी वितरकांकडून मेलवर मागणी करण्यात आली होती.
त्यानुसार ऑनलाइन पद्धतीने ट्रान्सपोर्ट संवर्गातील वाहन नोंदणी करण्यास परिवहन आयुक्त कार्यालयाने परवानगी परवानगी दिली आहे. दरम्यान संचारबंदी लागू असेपर्यंत ही सवलत असणार आहे. वाहन वितरकांना वाहन नोंदणीसाठी संबंधीत आरटीओच्या ई मेलवर अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज, विमा, पत्त्याचा पुरावा सादर करावा लागणार असून, चॅसीस पेन्सील प्रिंट, छायाचित्रदेखील जोडावे लागणार आहे.